Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, बुधवार १० ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:-

स्वत:वर ताबा ठेवावा. घरगुती प्रश्न मिटतील. दिवस खेळीमेळीत जाईल. साधनेला चांगला काळ आहे. केवळ कामावर लक्ष केंद्रित करावे. 



वृषभ:

खादी चांगली बातमी मिळेल. कामे जलद गतीने उरकण्याचा प्रयत्न करावा. व्यापारी वर्गाला दिवस लाभदायक असेल. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावा. चांगल्या गुंतवणुकीतून लाभाचे योग. 



मिथुन: 

वाहन विषयक अडचण मिटेल.  तरुण मंडळींनी फार उतावीळपणा करू नये. हातात काही अधिकार येतील. बदल स्वीकारावा लागेल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. 



कर्क:

विरोधक नामोहरम होतील. पारदर्शी व्यवहार करावेत. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. भावंडांना सहाय्य करावे लागेल. आज एखादी आठवण जागृत होईल. 



सिंह:

बोलण्यातून आत्मविश्वास प्रकट कराल. अतिविचार करू नका. मित्रांची उत्तम साथ लाभेल.नवे मनसुबे यश देतील. आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. 



कन्या:

घराबाहेर सावधानतेने वावरावे. कागदपत्रे नीट जपून ठेवावीत. कलाकार मंडळींना वेगळा दर्जा मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील. झोपेची तक्रार जाणवेल. 



तूळ:

शुभ वार्ता मिळतील. महिला वर्ग खुश राहील. टीमवर्क उपयोगाला येईल. नवीन विचार जाणून घेता येतील. मनातील प्रबळ इच्छा पूर्ण होईल.



वृश्चिक:

लाभाच्या अनेक संधी चालून येतील. कामात अधिक उत्साह वाटेल. मनातील चिंता दूर होईल. कमिशनच्या कामातून चांगली कमाई कराल. दिवसाची सुरुवात व्यस्त राहील. 



धनू:

धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.  निर्णय उत्स्फूर्तपणे घेतले तर फळाला येतील. ज्येष्ठांशी सुसंवाद साधावा. सहकार्‍यांशी वाद घालू नये. खाण्या-पिण्याचे पथ्ये पाळावीत.



मकर:

काळाची पाऊले ओळखावीत. धार्मिक कामात मन रमवाल. घरगुती वादविवादात अडकू नका. कामातील प्राधान्य जाणून घ्यावे. जुने व्यवहार लाभ देतील.



कुंभ:

सहकार्‍यांना सोबत कराल. भेटवस्तू देताना खर्चाचा विचार कराल.  जोडीदाराची प्रगती होईल. चर्चेतून नवकल्पना सुचतील. करमणूक प्रधान गोष्टी कराल. 



मीन:

स्वभावात उधळेपणा येईल. उत्साहाने कार्यरत राहाल. कौटुंबिक वादात पडू नका.  दिवसाची सुरुवात धीम्यागतीने होईल. समस्यांचे निराकरण होईल. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies