Type Here to Get Search Results !

उपचारासाठी आलेल्याच अल्पवयीन मुलीशी डॉक्टरनेच...!



भंडारा : तुमसर येथील विनोबानगरात वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी ॲक्युप्रेशर व नॅचरोपॅथी तज्ज्ञ डॉक्टरने अश्लिल चाळे करण्याचा प्रकार घडला.  याबाबत तुमसर पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी तक्रार दिल्यानंतर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून अटक केली. विजय भैय्यालाल डहाळे (रा. विनोबानगर तुमसर) असे अटकेतील डॉक्टरचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  आरोपी विजय भैय्यालाल डहाळेचे तुमसरात विनोबानगरात ॲक्युप्रेशर व नॅचरोपॅथी दवाखाना आहे. शालेय कवायती आणि धावण्याच्या सरावाने अल्पवयीन मुलगी कंबर आणि पायाच्या दुखण्याने त्रस्त होती. ती 13 ऑगस्टला उपचारासाठी डॉ. विजय डहाळे यांच्याकडे गेली होती. तपासणी कराताना डॉक्टरने अश्लील चाळे केले. या प्रकाराची माहिती मुलीने कुटुंबीयांना सांगितली असता बुधवारी सायंकाळी तुमसर ठाण्यात तक्रार देण्यात आली. 



दरम्यान, पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी तपास करून डॉक्टरविरुद्ध भादंविच्या कालमांसह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. डॉक्टरला तात्काळ अटक करण्यात आली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies