Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली अन...!



नागपूर: नागपूरच्या बेसा परिसरातील नाल्याच्या किनाऱ्यावर शाळेतील मुल असलेली स्कूल व्हॅन घुसल्याची घटना घडली आहे. यातील दोन मुले किरकोळ जखमी झाले आहेत. स्टेरिंग लॉक झाल्याने ही व्हॅन अर्धवट उलटली आहे. मुसळधार पावसामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही त्यामुळे हा अपघात झाला.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, आज सकाळी सुमारे १८ विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल व्हॅन शाळेच्या दिशेने जात होती. यावेळी मुसळधार पाऊस सुरू असल्याने चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे स्कूल व्हॅन थेट नाल्यात जाऊन पडली आहे.दरम्यान, नाला जास्त खोल नसल्याने दुर्घटना घडली नाही. मात्र, या अपघातात दोन विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर उर्वरित सर्व विद्यार्थी सुखरूप असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.



दरम्यान,  घटेनची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies