Type Here to Get Search Results !

शिवीगाळ करणाऱ्या आमदारांची ‘यांनी’ केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!



मुंबई - शिंदे गटातील आमदारांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. आज सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केले. तिथेच विरोधकदेखील आंदोलन करताना दिसत आहेत.दरम्यान, दोन्ही गटांच्या वादात आमदार अमोर मिटकरी यांनी महेश शिंदे यांची कॉलर पकडली असल्याचे दिसत आहे.या धक्काबुक्कीनंतर अमोल मिटकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकाराबद्दल आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती दिली. तसेच आपल्याला शिवीगाळ झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.



मिटकरी म्हणाले की, आम्ही संस्कृती जपणारी आणि पवार साहेबांच्या विचारांवर चालणारी माणसं आहोत. या घटनेनंतर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच त्यांना आम्हाला शिवीगाळ करणाऱ्यांना समज द्या अशी तक्रार केली. आम्ही विरोधी पक्ष आहोत, आम्ही जाब विचारणारच. आमची ५० खोके एकदम ओक्के घोषणा त्यांच्या जिव्हारी लागली. शिंदे गटातल्या आमदाराने धक्काबुक्की केली, पत्रकारांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर अजितदादांनी समजावून सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीला नेलं असे अमोल मिटकरी यांनी वक्तव्य केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies