सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरजेत बिबट्याच्या कातड्याची तस्करी करणाऱ्या एकाला महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केले आहे. समीर नारकर असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, सांगली जिल्ह्यातील मिरज एसटी स्टँडच्या पाठीमागील बाजूस बिबट्याच्या कातडीची तस्करी करण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळाली होती.
दरम्यान, पोलिस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी सापळा लागला होता. त्या ठिकाणी संशयित व्यक्ती मोठी प्लास्टिकची पिशवी घेऊन थांबलेला दिसला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. तसेच, त्याच्याजवळ बिबट्याचे कातडे पोलिसांना मिळून आले. या बिबट्याच्या कातड्याची किंमत 5 लाख 25 हजार रुपये आहे.