नवी दिल्ली: काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक रविवारी, २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता व्हर्च्युअल होईल, अशी माहिती पक्षाचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी दिली जाईल, असेही ते म्हणाले.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अध्यक्ष होण्यास नकार कळवला आहे. गांधी घराण्याबाहेरील नेत्याने पक्षाचे नेतृत्व स्वीकारावे, असे राहुल गांधी यांना वाटते. सोनिया गांधींना आरोग्यविषयक समस्यांमुळे अध्यक्षपद नकोय. तर राहुल गांधी यांनीच पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, असे काही नेत्यांना वाटते.
दरम्यान, सोनिया गांधी यांनी अशोक गहलोत यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद देण्यास सांगितल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.