'अजित पवारांनी सरकार कोसळण्याची वाट पाहावी’; ‘यांचे’ मोठे वक्तव्य!मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकार कोसळण्याची वाट पाहावी. आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करण्यास सक्षम आहोत. आमच्या दोन्हीही पक्षात उत्तम समन्वय असल्याचे वक्तव्य भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केले.यावेळी दरेकर म्हणाले, 'काम वेळेत होणे गरजेच आहे म्हणून मंत्र्यांचे आधिकार हे सचिवांना देण्यात आले आहेत. मविआच्या काळात सचिवांचे आधिकार काढून घेण्यात आले होते. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. मुख्यमंत्री कार्यरत आहे अस्तित्वात आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याची आवश्यकता नसल्यांचही ते यावेळी म्हणाले.तसेच, अजित पवार यांनी सरकार कोसळण्याची वाट पाहावी. आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करण्यास सक्षम आहोत. आमच्या दोन्हीही पक्षात समन्वय उत्तम आहे. तुम्हांला लवकरच मंत्रिमंडळ विस्तार पाहायला मिळेल असेही ते म्हणाले.दरम्यान, आता मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार संबंधित विभागांच्या सचिवांना देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत यावरुन देखील विरोधक टीका करत आहेत. याच पार्श्वभूमिवर आता दरेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured