Type Here to Get Search Results !

"...तर मीदेखील मंत्रिपदाची शपथ घेईन": ‘यांचे’ मोठे वक्तव्य!



मुंबई: महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. भाजप आणि शिंदे गटाचे किती मंत्री शपथ घेणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, काल, सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थानी  तीन तास  बैठक पार पडल्यानंतर मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, रवींद्र पवार, सुधीर मुनगंटीवार हे बाहेर पडले. यावेळी त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल का असा प्रश्न माध्यमांनी विचारल्यावर त्यांनी मंत्रिपदाबाबत सुचक वक्तव्य केले आहे. 



यावेळी, भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "आज मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे शपथ घेणाऱ्या मंत्र्याची यादी सोपवणार आहे. सकाळी ११ वाजता शिंदे गटाचे आणि भाजपचे आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेतील आणि कुणाला कोणतं मंत्रिपद मिळेल तसेच किती कुणाचे किती मंत्री असतील हे लवकरच स्पष्ट होईल" तसेच "तुमच्या सदिच्छा राहिल्या तर मीदेखील उद्या शपथ घेईन आणि माझं नाव त्या यादीत असेल" असेही वक्तव्य त्यांनी केले.



दरम्यान, आज शिंदे गट आणि भाजप यांचे मिळून १२ ते १५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies