Type Here to Get Search Results !

शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ‘हायजॅक’ करणार शिंदे गट?



मुंबई: शिवसेनेसाठी नवसंजीवनी असणारा शिवसेनेचा दसरा मेळावाच हायजॅक करण्याच्या प्रयत्न शिंदे गटाकडून करण्यात येणार आहे.यासाठी शिंदे गटाला भाजपही साथ देत असून पडद्यामागून भाजपच्या जोरदार हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 



तसेच, शिवसेनेने याअगोदरच दसरा मेळाव्यासाठी दादरमधील शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली आहे. मात्र, मुंबई महापालिकेने शिवसनेला मैदानासाठीची परवानगी नाकारली आहे. अशाताच शिंदे गटाकडून हे मैदान मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.



दरम्यान, शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे शिवाजी पार्क मैदानावर दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचे पक्षप्रमुख सभा घेत शिवसैनिकांना आपल्या भाषणातून नवसंजीवनी आणि दिशा देतात. मात्र, यंदाच्या वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार का? याबाबत संभ्रम आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies