Type Here to Get Search Results !

“मी मोदींना घाबरत नाही...” : ‘यांचे’ मोठे वक्तव्य!



नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या चौकशीनंतर ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रथमच याबाबत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. 



राहुल गांधी म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे जे काही राजकारण करत आहेत ते सर्वलोकशाही विरोधात आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत दबाव टाकून आम्हाला गप्प करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण आम्ही घाबरणार नाही. मी मोदींना घाबरत नाही, तुम्हाला जे करायचे ते करा', असे राहुल गांधी यांनी वक्तव्य केले आहे.



दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीनंतर त्याविरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी निदर्शने केली होती. राहुल गांधीही रस्त्यावर उतरले होते. त्याचवेळी राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. भाजपकडून केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर होत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला होता.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies