Type Here to Get Search Results !

सोन्या- चांदीच्या दरात वाढ ; जाणून घ्या आजचे दर!



नवी दिल्ली: जागतिक बाजारातील किमतीत वाढ झाल्याने बुधवारी सकाळी भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरातही वाढ झाली आणि सोन्याचा भाव पुन्हा एकदा ५२ हजारांच्या जवळ पोहोचला आहे.



मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर, आज सकाळी २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव ६० रुपयांनी वाढून ५१,८९७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. यापूर्वी सोन्याचे - दर ५१,८४३ रुपयांच्यावर सुरू झाला होता, पण मागणी वाढल्याने त्याची किंमत लवकरच ५१,९०० रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. 



तसेच, आज सकाळी चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. एससीएक्सवर, चांदीची किंमत १६५ रुपयांनी वाढून ५७,८३० रुपये प्रति किलो झाली आहे. यापूर्वी, चांदीचे दर ५५,७७६ च्यावर सुरू झाला होता, पण मागणी वाढल्याने लवकरच त्याचे भाव ५७,८०० च्या पुढे गेले आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies