Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, शुक्रवार १९ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:-

खर्चासाठी हात आवरता घ्यावा. कलात्मक गोष्टींची ओढ वाढेल. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल. बौद्धिक चर्चा कराल. जुन्या आठवणींनी मनाला समाधान मिळेल. 


वृषभ:-

आरोग्याबाबत हलगर्जीपणा करू नका. बोलण्यातून समोरच्यांची मने जिंकाल. मनात उगाच शंका आणू नका.  हातातील कामात खंड पडू देऊ नका. घरातील कामांची जबाबदारी वाढेल. 


मिथुन:-

वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल. आपल्या निर्णयावर ठाम राहावे. अनावश्यक गोष्टींसाठी खर्च होऊ शकतो.  लोकांशी वैयक्तिक संपर्क टाळावा. आवडीच्या गोष्टी करण्यात अधिक रमून जाल. 


कर्क:-

हौसेवर पैसे खर्च कराल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. सर्वांशी आपुलकीने वागा. बाहेरील लोकांना भेटणे टाळा. जबाबदारीची जाणीव जागृत ठेवा. 


सिंह:-

मनातील खिन्नता काढून टाकावी. तुमच्या कामाची शाबासकी मिळेल. मित्रांशी गप्पा रंगतील. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवावे. स्वप्नातून बाहेर येऊन कामाला लागा. 


कन्या:-

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्या.घरातील वातावरण आनंद देऊन जाईल. विनाकारण कुणाच्या मदतीला धावू नका.  वरिष्ठांशी शांतपणे वागा. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. 


तूळ:-

तिखट पदार्थ टाळा.  उत्तम वाचनाचा आनंद घ्याल. शांत राहून मानसिक स्वास्थ्य अनुभवा. भावंडांसाठी पैसा खर्च होईल. एखादी नवीन योजना सुचेल. 


वृश्चिक:-

संपर्कातील लोकांशी फटकून वागू नका. मुलांवरील खर्च वाढेल. वादाचे प्रसंग टाळावेत. आपल्या बोलण्यातून कोणी दुखवणार नाही याची दक्षता घ्या. अधिकार जपून वापरा. 


धनू:-

उत्साहाच्या भरात अनाठायी खर्च वाढू शकतो. समोरच्याचे शांतपणे ऐकून घ्यावे. आहारावर नियंत्रण हवे.  आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. आर्थिक बाबतीत उत्तम दिवस. 


मकर:-

उदात्त दृष्टीकोन ठेवाल. छंद जोपासण्यासाठी वेळ काढावा. दुसर्‍यांच्या मदतीला धावून जाल. इतरांच्या कामात दिवस घालवाल. जुनी कामे व्यवस्थित पार पडतील. 


कुंभ:-

समस्यांचे निराकरण करता येईल. निरूत्साह झटकून कामाला लागा. धाडस दाखवताना सारासार विचार करावा.  घरातील कामे मार्गी लावा. जुन्या गोष्टींबाबत मनात संभ्रम बाळगू नका. 


मीन:-

मुलांना वेळ द्यावा.स्वप्न पूर्ण करण्याची ताकद बाळगा. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल.  अचानक येणार्‍या खर्चावर नियंत्रण ठेवा. अति तिखट पदार्थ कमी खा. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies