Type Here to Get Search Results !

गावात दारुबंदी अन् सरपंचांच्या घरी सापडली देशी दारू!



अमरावती : अमरावती जिल्ह्यतील चांदुर रेल्वे तालुक्यातील सांवगी मग्रारापूर या गावात दारूबंदी असतानाही चक्क सरपंचाच्या घरात देशी दारू आढळली आहे. 


प्राप्त माहितीनुसार, माहिती मिळाली कि चांदूर रेल्वे पोलिसांनी धाड टाकून सरपंच यांच्या घरातून नऊ हजार दाेनशे रूपयांच्या किंमतीची देशी दारूच्या २३० बाटल्या जप्त केल्या. चांदूर रेल्वे पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीत सरपंच यांच्या घराच्या कोपऱ्यातून पलंगाखाली गोल्डन संत्रा कंपनीच्या ९० मिलीच्या ९ हजार २०० रूपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या सापडल्या.


दरम्यान, या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी सरपंच यांचे पती राजु शंकर सुर्यवंशी (वय ४०) यांना समजपत्र देवून सोडण्यात आले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies