Type Here to Get Search Results !

काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याने दिला पक्षाचा राजीनामा!



नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांनी पाच पानी पत्र लिहिले आहे.



दरम्यान, बऱ्याच काळापासून गुलाम नबी आझाद हे काँग्रेसवर नाराज होते. जी-२३ गट हा काँग्रेसमध्ये बदल करण्याची मागणी सातत्याने करत होता. या गटात आझाद देखील होते. यापूर्वी काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही पक्षाचा राजीनामा दिला होता. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies