Type Here to Get Search Results !

“एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील एकमेव अडाणी मंत्री”: ‘यांचे’ वादग्रस्त वक्तव्य!



मुंबई : 'गुडघ्याला बाशिंग बांधून वावरणारे हे एकनाथ शिंदे, त्यांना ना शिक्षणाचा पत्ता ना इतर सरकारी प्रक्रिया कशा असल्या पाहिजे त्याचा पत्ता नाही. कुठेतरी स्वत:च नाव द्यायचं आणि त्याचं नामकरण करायचं. अशा पद्धतीचे महाराष्ट्रातील एकमेव अडाणी मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख महाराष्ट्राच्या इतिहासात होईल' असे वादग्रस्त वक्तव्य विनायक राऊत यांनी केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 



'ज्या उद्यानाला नाव द्यायंच होतं त्या उद्यानाच्या नावाचा प्रस्ताव पुणे महापालिकेने मंजूरच केला नाही. त्याठिकाणी केवळ एकनाथ शिंदे यांचं नाव येतंय. म्हणून उद्घाटनाला जातात यापेक्षा अडाणीपणा कोणता असू शकतो'. असे विधानही विनायक राऊत यांनी केले आहे.



दरम्यान,पुण्यातील एका उद्यानाला एकनाथ शिंदे यांचं नाव देण्यात आलं होतं. या उद्यानाच्या उद्घाटनाला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार होते. मात्र नाव देण्यावरून वाद निर्माण झाल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. यावरून टीका करताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies