Type Here to Get Search Results !

जुन्या वादातून अल्पवयीन मुलांनी केला युवकाचा खून!



सातारा: सातारा जिल्ह्यातील मठाचीवाडी (ता. फलटण) येथील एकाचा बारामती शहरातील श्रीरामनगर भागातील कवी मोरोपंत शाळेजवळ गुरुवारी सायंकाळी खून झाल्याची घटना घडली आहे. हा खून अल्पवयीन मुलांनी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, बारामती शहरातील श्रीरामनगर भागात जुन्या वादाच्या कारणातून अल्पवयीन मुलांनी एकाचा खून केला. शशिकांत बाबासाहेब कारंडे (मूळ राहणार मठाचीवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा) सध्या राहणार एचडीएफसी बँक मागे भिगवण रोड बारामती असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.कारंडे हे त्यांच्या नातवाला नेण्यासाठी कविवर्य मोरोपंत शाळेजवळ आले होते. यादरम्यान काहींनी त्यांच्यावर कु-हाडीनं हल्ला केला.



दरम्यान, या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies