हॉटेलमधील रुममध्ये प्रेमयुगुलांची आत्महत्या!



औरंगाबाद: रेल्वेस्टेशन परिसरातील द ग्रेट पंजाब हॉटेलमधील २०५ नंबरच्या रुममध्ये प्रियकराने गळफास घेतला तर प्रियेसीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. सागर राजेश बावणे (२२, रा. संभाजी कॉलनी, एन ६, सिडको) आणि सपना अंकुश खंदारे (२१, प्लॉट नंबर ३४, लक्ष्मीनगर मुकुंदवाडी) असे आत्महत्या केलेल्या प्रेमयुगुलांची नावे आहेत. दोघे आंतरजातीय असल्याचे समोर आले आहे.



याबद्दल अशी माहिती कि,  सागर हा बीएच्या दुसऱ्या वर्षात तर सपना १२ वीमध्ये शिक्षण घेत होती. मृत युवक सागर बावणे याने २९ जुलै रोजी रेल्वेस्टेशन रोडवरील ग्रेट पंजाब हॉटेलमधील रुम नंबर २०५ बुक केली होती. त्या रुममध्ये सपना खंदारे ही ३० जुलै रोजी दाखल झाली. दोघांचे आधारकार्ड हॉटेलचालकांनी घेतले होते. रुममध्ये गेल्यानंतर दोघांनी कोणतीही ऑर्डर व्यवस्थापनाकडे केली नाही. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी स्वच्छता कर्मचारी रुमच्या बाहेर झाडू मारीत असताना रुममधुन आतमधुन दुर्गंधी येऊ लागली. 



कर्मचाऱ्याने रुमचा दरवाजा वाजवला असता, आतुन प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांने हॉटेल व्यवस्थापकाला याविषयी माहिती दिली. हॉटेल व्यवस्थापकांनी तात्काळ वेदांतनगर पोलिसांना कळविले. 



दरम्यान, निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक सुधाकर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. व्हिडिओ शुटिंग करीतच रुमचा दरवाजा तोडला. तेव्हा आतमध्ये सागर हा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. तर सपना ही बेडवर बेशुद्ध आढळून आली. दोघांना घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured