Type Here to Get Search Results !

पंकजा मुंडे यांना भविष्यात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये योग्य संधी; ‘यांचे’ मोठे वक्तव्य!



पुणे: ' पंकजा मुंडे यांच्यापुढे मोठं भविष्य, वय आहे, त्यांना काम करत राहावं लागेलं. त्यांनी थोडी सबुरी पाळली पाहिजे, त्यांना योग्य सन्मान मिळेल. त्यामुळे पंकजा यांना भविष्यात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये योग्य संधी दिली जाणार असे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले.



दरम्यान, मंत्रिपदासाठी तुमच्या नावाची चर्चा होते पण मंत्रिपद का दिलं जात नाही ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, मुंडे म्हणाल्या, 'माझी तेवढी पात्रता नसेल. माझ्यापेक्षा पात्रतेचे लोक असतील. माझी पात्रता वाढेल आणि त्यांना वाटेल माझी पात्रता तेव्हा मला मंत्रिपद देतील. याच्याबद्दल मला काहीही अपेक्षा नाहीत. शिवाय माझ्या कार्यकर्त्यांमध्ये याबाबत चर्चा होतात. मात्र, माझे कार्यकर्ते आणि मी शांत बसलो आहोत. मी जे काही काम करते ते स्वाभिमानाने करते'असे म्हणत भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी काल त्यांनी नाराजी व्यक्त केली.त्यांच्या याच नाराजीवर आज शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी भाष्य केले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies