Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, रविवार ७ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!




मेष :-

आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.  राजकीय भूमिकेला यश येईल. अतिघाई चांगली नाही. तुमचा उत्साह वाढीस लागेल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य मिळेल. 



वृषभ:-

भावंडांचे अधिक प्रेम मिळेल.  सामाजिक भान राखावे लागेल. मित्रांच्या सहवासात रमून जाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. तरुण वर्गाला आशादायक संधी मिळतील.



मिथुन:-

आवडीच्या पदार्थांवर ताव माराल. मित्रांशी वाद घालू नयेत. जमिनीच्या कामातून लाभ होऊ शकतो. प्रत्येक गोष्टीत गोडी वाटेल. मुलांसाठी लाभदायक गोष्टी घडतील.



कर्क:-

मानसिक चंचलता जाणवेल. अनाठायी खर्च करू नका. अघळ-पघळ गोष्टी बोलू नका. कामाच्या ठिकाणी बदलाचे वारे वाहू लागतील. बोलताना भान राखावे.



सिंह:-

मित्रांची उत्तम साथ लाभेल.  मनोवांच्छित लाभेल. नवीन काम सुखावणारे असेल. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. मानसिक चांचल्य राहील.



कन्या:-

व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. तुमचा दर्जा सुधारला जाईल. झोपेची तक्रार जाणवू शकते. काही नवीन ओळखी होतील. तरुण वर्गाचे विचार जाणून घ्याल.



तूळ:-

नवीन कामात गढून जाल. कमिशनमधून लाभ मिळवाल. पत्नीचा वरचष्मा राहील. अधिकारी लोकांशी भेटता येईल. गोड बोलण्यातून लोक संग्रह वाढेल.



वृश्चिक:-

वाढीव मेहनत करावी लागू शकते. भावंडांशी वाद घालू नका. गुंतवणुकीच्या योजना सावधपणे कराव्यात. उगाच टोकाची भूमिका घेऊ नका. वडिलोपार्जित कामातून लाभ संभवतो.



धनू:-

काही कामे कमी कष्टात पार पडतील. आध्यात्मिक आवड वाढेल. पित्त विकार वाढू शकतात. अचानक धनलाभ संभवतो. कथित गोष्टीवर विश्वास ठेऊ नका.



मकर:-

कामात सुलभता येईल. प्रशंसेचा दिवस. भावनिक वळणे येऊ शकतात. शेजार्‍यांचा त्रास होण्याची शक्यता. दांपत्य जीवन सुखकारक राहील. 



कुंभ:-

स्वत:ला नियमात बांधू नका. मौजमजा कराल. कार्यक्षेत्रात मान, सन्मानाचे योग येतील. जोडीदाराची प्रगती होईल. नवीन कामात उत्साह जाणवेल. 



मीन:-

सुसंवादातून लाभ होतील. परिश्रमाची कास सोडू नये. विरोधक शांत राहतील. महत्वाकांक्षी योजना आमलात आणाव्यात. घरातील कामात मन गुंतवाल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies