Type Here to Get Search Results !

चिकमहुद : एस. टी. बस शिरली मटणाच्या दुकानात : बस चालकाच्या प्रसंगधवनाने जीवितहानी टळली

सांगोला/दीपक सावंत : सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथे बंद असलेल्या मटणाच्या दुकानात एस.टी. बस शिरली. परंतु सोमवार असल्याने मटणाचे दुकान बंद असल्याने जीवितहानी टळली.

याबाबत घटना स्थळवरून मिळालेली माहिती अशी, दापोली आगाराची बस क्र. (MH14BT4013) अक्कलकोट दापोली ही बस अक्कलकोट हून पंढरपूर मार्गे दापोली कडे निघाली होती. सदरची बस ही चिकमहुद येथे आली असता बस च्या आडवा दारुडा आल्याने त्याला वाचविण्यासाठी बस ड्रायव्हरने बस एका बाजूला घेतली असता रस्ता सोडून बस दुसऱ्या बाजूला असलेल्या मटणाच्या दुकानात शिरली.

परंतु सदरचे मटनाचे दुकान सोमवार असल्याने बंद होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु बसचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी भेट दिली आहे. सदर घटनेची नोंद पोलिसात झाली आहे का नाही हे समजू शकले नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies