Type Here to Get Search Results !

“बारामतीला गेलेला पैसा पाहा, मग खोके खोके ओरडा”



मुंबई: "गेल्या चार दिवसांपासून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आमच्याबाबत ५० खोके, एकदम ओके अशा घोषणाबाजी करण्यात येत होत्या. आम्ही काही न बोलता बाजूनं जात होतो. पण आज जेव्हा आम्ही गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीकडून केल्या गेलेल्या भ्रष्टाचाराबाबत बोललो तर त्यांना चांगलंच झोंबलेलं दिसतंय. जे अमोल मिटकरी ५० खोके ओरडत आहेत. त्यांना माझं आव्हान आहे की गेल्या अडीच वर्षात अजित पवार यांनी बारामतीला किती पैसा पाठवला याची माहिती घ्यावी मग खोके खोके ओरडावं", असे महेश शिंदे यांनी वक्तव्य केले.



दरम्यान, राज्याच्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज शिंदे गटातील आमदार आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये जोरदार राडा झाला. एकमेकांच्या अंगावर धावून जाणाऱ्या आमदारांमध्ये शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची नावे प्रामुख्याने समोर आली. घडलेल्या घटनेवरुन अमोल मिटकरी यांनी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्यामुळे वातावरण चिघळल असा आरोप केला. त्यावर आता आमदार शिंदे यांनीही मिटकरींनी प्रत्युत्तर दिले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies