Type Here to Get Search Results !

“तू माझ्या आयुष्यातून निघून जा नाही तर....” पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने...!



पुणे : मुंढव्यातील केशवनगर येथे गुरुवारी सकाळी पावणेआठ वाजता विवाहितेने गळफास घेत  आत्महत्या केली. दीपाली समाधान गायकवाड (वय ३०, रा. केशवनगर, मुंढवा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  दीपाली व समाधान गायकवाड यांचा विवाह झाला होता. दोन वर्षापासून पती मला दुसरे लग्न करायचे असल्याचे सांगून तू माझ्या आयुष्यातून निघून जा नाही तर मी तुला मारुन टाकीन असे सातत्याने बोलत मारहाण करी असे, त्यामुळे  दुसरे लग्न करण्यासाठी पतीकडून होणा-या छळाला कंटाळून दीपाली हिने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. 



दरम्यान, आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरुन पोलिसांनी समाधान मारुती गायकवाड (रा. केशवनगर, मुंढवा, मुळ बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक बिनवडे तपास करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies