नवी दिल्ली: बॉक्सिंगमध्ये अमित पंघालनं पुरुषांच्या 48-51 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले आहे. त्यानं अंतिम सामन्यात इंग्लंडच्या किआरन मॅकडोनाल्डचा 5-0 असा पराभव केला.
दरम्यान, अमित पंघालने पुरुषांच्या 52 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या किआरनमॅकडोनाल्डचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. गोल्ड कोस्ट येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सच्या मागील हंगामात पंघालने रौप्य पदक जिंकले होते. त्याने फ्लायवेटमध्ये युरोपियन चॅम्पियनशिपमधील रौप्यपदक विजेता किआरन मॅकडोनाल्डचा 5-0 असा पराभव केला.