Type Here to Get Search Results !

“भाजप 'आप'चे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहे”; 'आप'चे काही आमदार नॉट रिचेबल!



नवी दिल्ली: दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला पोहचला आहे. भाजप दिल्लीत देखील 'ऑपरेशन लोटस' करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच 'आप'चे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आपचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी 11 वाजता त्यांच्या निवास्थानी आम आदमी पक्षाची बैठक बोलावली. या बैठकीसाठी सर्व आमदारांना आमंत्रीत करण्यात आले होते.



परंतु, या बैठकीपूर्वीच भाजप 'आप'चे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीकडून केला जात आहे. भाजप दिल्लीतील केजरीवाल सरकार पाडण्याचा कट रचत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.


दरम्यान, केजरीवाल यांनी बोलावलेल्या बैठकीपुर्वी आम आदमी पक्षाचे अनेक आमदार संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आपच्या अनेक आमदारांशी संपर्क होऊ शकला नाही. याशिवाय, आता आपचे सर्व आमदार संपर्कात असून त्यापैकी 53 आमदार बैठकीला पोहोचले आहेत. एक आमदार वाटेत. तर 8 आमदार दिल्लीबाहेर असल्याची माहिती आपकडून देण्यात येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies