Type Here to Get Search Results !

ब्रेकअप नंतरही तरुणाने विवाहित प्रेयसीला मिळवण्यासाठी केले ‘हे’ भयंकर कृत्य!पुणे : पुण्यात तरुणाने ब्रेकअप झाल्यानंतरही विवाहित प्रेयसीचा पाठलाग सुरूच ठेवला. तरीही ती ऐकत नाही म्हटल्यावर तिच्या नवऱ्यालाच मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठवले. यानंतर मात्र तरुणीचा संयम संपला आणि तिने पोलिसात तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी आता या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. शुभम शिवाजी पुंड (वय २५, रा. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे. 25 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे.प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार तरुणी आणि आरोपी शुभम पुंड हे पूर्वी एकाच ठिकाणी काम करायचे. यातून त्यांची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. मात्र त्यानंतर काही महिन्यातच प्रियकराचे आणखी एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे फिर्यादीला समजले. त्यानंतर तिने त्याच्याशी हळूहळू बोलणे कमी केले. त्याचा मोबाईल नंबर ही ब्लॉक केला. काही दिवसांनी फिर्यादी तरुणीचे एका तरुणासोबत लग्न ठरले आणि त्यांचा विवाह देखील संपन्न झाला. मात्र यानंतरही आरोपी शुभम काही शांत बसला नाही. त्याने तिचा पाठलाग सुरूच ठेवला. तसेच, तर आरोपीने फिर्यादीच्या पतीचा मोबाईल नंबर मिळवला आणि फोन केले, धमकीचे मेसेज पाठवले. “तू तिला डिवोर्स दे, घरातून हाकलून दे, नाहीतर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईन आणि या गोष्टीला तुम्ही दोघे जबाबदार असणार" असे मेसेज पाठवले. यानंतरही तरुणी ऐकत नाही म्हटल्यावर त्याने सोशल मीडियावर फिर्यादीचे अश्लील फोटो आणि मेसेज पसरवले. दरम्यान, हडपसर पोलिसांनी याप्रकरणी भादवी 354, 354 क, 354 ड, 504 आणि 506 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies