अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या व्याळा येथील पॉलिटेक्निक कॉलेजमधील तीन तरुण आणि एक तरुणी मागील एक ऑगस्टपासून बेपत्ता झाले आहेत. १ ऑगस्टला चौघेही घरून कॉलेजला जातो म्हणून गेले होते. मात्र, तेव्हापासून ते परतलेच नाहीत.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, बेपत्ता झालेल्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील तिघांचा तर बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील तरुणाचा समावेश आहे. तुळशी अनिल ताले वय १८ , राहणार रेणुका नगर, डाबकी रोड, अकोला, प्रतीक मनोहर तायडे वय २१ रा.अडगाव बु. ता.तेल्हारा, जि. अकोला, हर्ष विष्णू घाटोळ वय १७ वर्ष पळशी खुर्द ता.खामगाव, जि.बुलढाणा आणि प्रफुल पांडुरंग लंगोटे वय १९, राहणार न्यू भीम नगर, कृषी नगर, अकोला अशी बेपत्ता विद्यार्थ्यांची नावे आहेत.
दरम्यान, हे चौघे बेपत्ता असल्याची तक्रार बाळापुर आणि सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.