Type Here to Get Search Results !

“एकनाथ शिंदे जेवढी सदस्य संख्या करत आहेत, त्याच्या दहापट...” उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य!

 


मुंबई : सध्या एकनाथ शिंदे गटावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जोरदार टीका करत आहेत. 



यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “भगव्याला कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला दाखवून द्या. भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची कोणाची हिंमत व्हायला नको. माझा शिवसैनिकांवर विश्वास आहे. एकनाथ शिंदे गटाने नोंदणीसाठी एजंट लावले आहेत. जेवढी सदस्य संख्या ते करत आहेत, त्याच्या दहापट सदस्य संख्या मला हवी आहे, केवळ गर्दी आणि फोटो नको. कारण फोटो घेऊन निवडणूक आयोगाकडे गेलो, तर तुमचे सदस्य दाखवा असे ते म्हणतील. त्यांच्या एजन्सी काम करत आहेत, असे म्हणत ठाकरे यांनी शिंदे गटावर तसेच एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.



दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies