Type Here to Get Search Results !

‘येथे’ एकनाथ शिंदेसारखा हुबेहूब व्यक्ती; जाणून घ्या अधिक माहिती!



पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  हे उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांचा हा पहिलाच पुणे दौरा असणार आहे. या दौऱ्यात ते फुटबॉल मैदानाचे उद्‌घाटन करणार आहेत. तसेच, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरतीही करणार आहेत. 



दरम्यान, पुण्यात एकनाथ शिंदे यांच्यासारखे दिसणारे एक व्यक्ती आहेत. विजयराजे माने असे त्यांचे नाव. विजयराजे माने हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखेच दिसतात. माने यांनी चेहऱ्यावर वाढवलेली दाढी, कपाळावरचा टिळा, आणि ते परिधान करत असलेले वाईट शर्ट आणि वाईट पॅन्ट, आणि ते वापरत असलेला एकनाथ शिंदे यांच्यासारखाच चष्मा सगळ्यांमुळे माने हे शिंदे यांचे डुप्लिकेट दिसतात.



तसेच, अनेक सामान्य पुणेकर हे माने यांना भेटत आपल्या मागण्यांचा अर्ज देखील देतात, माने सांगतात की मी जिथे जातो तिथे लोक माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी आग्रह करतात, याशिवाय, २१ जून रोजी ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यादिवशी त्यांच्या घराबाहेर लोकांनी मोठी गर्दी केली होती.आजही माने ज्यावेळी रस्त्यावरून जातात त्यावेळेस लोक त्यांना थांबवत सेल्फी घेण्याचा आग्रह करतात. माने हे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत.(सौ.साम)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies