Type Here to Get Search Results !

मोठी बातमी: ३९ जवानांना घेऊन जाणारी बस कोसळली दरीत ; ६ जवान शहीद!




जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमध्ये 'आयटीबीपी'च्या जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या बसमध्ये ३९ जवान होते, तर बसमधील ६ जवान शहीद झाल्याचे समोर येत आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, अपघात झालेले आयटीबीपीचे सर्व जवान हे अमरनाथ यात्रेच्या ड्यूटीवर तैणात होते. ही बस चंदनवाडीहून पहलगामला जात होती. दरम्यान, बसचा ब्रेक निकामी होऊन बस दरित कोसळली.  या बसमध्ये ३९ जवान होते. त्यापैकी ३७ आयटीबीपीचे होते, तर २जम्मू-काश्मीर पोलिसांचे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून ३९ जवानांपैकी ६ जवान शहिद झाले आहेत.



दरम्यान, या बसमधील अनेक जवान जखमी झाले असून या जवानांना उपचारासाठी श्रीनगरमधील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies