Type Here to Get Search Results !

'मेरा पीछा छोड़ो बहन...' टीम इंडियाचा स्टार ऋषभ पंतवर उर्वशीला बहीण म्हणण्याची आली वेळ!मुंबई - टीम इंडियाचा स्टार ऋषभ पंत आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या दोघांमधील वाद इतका वाढला की पंतला शेवटी उर्वशीला बहीण म्हणण्याची वेळ आली आहे.दरम्यान, अलीकडेच उर्वशीने एक मुलाखतीत   दिल्लीच्या हॉटेल मधला एक किस्सा सांगितला. मी वाराणसीला शूटिंग करुन दिल्लीला आली होती. तिथे माझा शो होता. मी पूर्ण दिवस शूटिंग केलं होतं. 10 तासाच्या शूटिंग नंतर मी परत आले, तेव्हा थकले होते. मी येऊन झोपले. त्यावेळी मिस्टर आरपी तिथे आला व लॉबी मध्ये बसून माझी वाट पाहत होता. त्याने मला जवळपास 17 फोन कॉल केले होते. मला ते आवडले नाही. मग मी त्याच्याशी बोललो आणि म्हणाले की तू मुंबईला आल्यावर भेटू.यानंतर  जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर पंतनेही सोशल मीडिया पोस्टद्वारे उत्तर दिले. मात्र त्याने ही पोस्ट अवघ्या काही मिनटात काढून टाकली. पण त्याचा स्क्रीनशॉट सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. यात पोस्टमध्ये पंतने लिहिले आहे की, लोक फक्त हेडलाइन्स आणि लोकप्रियतेत राहण्यासाठी खोटे बोलतात. काही लोक मुलाखती मध्ये खोटं बोलतात. जेणेकरुन त्यांना लोकप्रियता मिळेल. ते हेडलाइन मध्ये येतील. काही लोक लोकप्रियतेचे भुकेले आहेत. ही खूप खराब बाब आहे. देव त्यांचे कल्याण करो. हॅशटॅगममध्ये मेरा पीछाछोडो बहन असेही लिहिले आहे.

दरम्यान, ‘छोटू भैय्याने बॅट-बॉलच खेळलं पाहिजे. बदनाम होण्यासाठी मी काही मुन्नी नाही. डार्लिंग तुला रक्षाबंधनच्या शुभेच्छा’, ‘आरपी छोटू भैय्या’, ‘शांत मुलीचा फायदा घेऊ नकोस’ अशा आशयाचे हॅशटॅग्स दिले आहेत.(सौ. साम)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies