Type Here to Get Search Results !

ईदगाह मैदानावरच होणार गणेशोत्सव: कर्नाटक उच्च न्यायालय!



बेंगळुरू: गणेश चतुर्थी कर्नाटकातील हुबळी येथील हुबळी ईदगाह मैदानावर होणार आहे. या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयाने रात्री उशिरा निकाल दिला आहे. याच प्रकरणावर मंगळवारी दुपारी सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हुबळी धाडवड नगरपालिकेने ईदगाह मैदानावर तीन दिवस गौरी गणेशाच्या पूजेला दिलेली मान्यता कायम ठेवली होती.


दरम्यान, यासोबतच अंजुमन-ए-इस्लामने दाखल केलेली याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली होती. मात्र, बेंगळुरू येथील इदगाह मैदान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हुबळीच्या अंजुमन-ए-इस्लाम संस्थेने पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर न्यायमूर्ती अशोक एस किनगी यांच्या चेंबरमध्ये सुनावणी झाली आणि युक्तिवाद ऐकून न्यायालयाने हा निर्णय दिला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies