Type Here to Get Search Results !

“मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं”: अजित पवारांनी शोक व्यक्त केला!



मुंबई - शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे 52 व्या वर्षी अपघाती निधन झाले आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर हा अपघात झाला असून पहाटे 5:30 वाजता भातान बोगद्याजवळ ही घटना घडली. दरम्यान, मेटेंच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. 



दरम्यान, “ शिवसंग्राम पक्षाचे नेते, विधानसभेचे माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं मराठवाड्याचा कर्तृत्ववान सुपुत्र, मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे. मी माझा निकटचा सहकारी गमावला आहे”, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies