Type Here to Get Search Results !

ट्रकची टेम्पोला धडक; एकाचा जागीच मृत्यू!शहापूर :नवीन कसारा घाटात दोन वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण जखमी झाला आहे. पप्पू यादव असे मृत चालकाने नाव आहे.याबद्दल अधिक माहिती अशी कि, नवीन कसारा घाटात नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका केळाच्या ट्रकने टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे टेम्पो दरडीवर जाऊन आदळला. त्यानंतर पलटी झाला.‌ या टेम्पोत चालक अडकला होता. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर चालकास बाहेर काढले मात्र तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.दरम्यान मयत व्यक्ती पप्पू यादव याचा मृतदेह कसारा प्राथामिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies