Type Here to Get Search Results !

बच्चू कडूंना मोठा धक्का ; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश!



अमरावती: अमरावतीत शिवसेनेने बच्चू कडू यांना मोठा धक्का दिला आहे. दर्यापूर तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा तालुकाप्रमुख किरण होले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.



अमरावती शिवसेना जिल्हाप्रमुख खराटे यांच्या नेतृत्वात किरण होले यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषदचे अपक्ष असलेले सदस्य सुनील डिके यांनी सुद्धा हाती शिवबंधन बांधलं आहे.तसेच, दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथील काँग्रेसचे सरपंच योगेश मापारी यांचा सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला. 



दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. किरण होले हे अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष होते. मात्र, आता त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत हातात शिवबंधन बांधले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies