Type Here to Get Search Results !

आजचे दिनविशेष; जाणून घ्या इतिहासातील महत्वाच्या घटना!



आटपाडी: आज 8 ऑगस्ट म्हणजेच पुत्रदा एकादशी. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 



8 ऑगस्ट : पुत्रदा एकादशी.

हिंदू धर्मग्रंथानुसार, पुत्रदा एकादशी 2022 वर्षातून दोनदा येते. पहिला पुत्रदा एकादशी व्रत पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला ठेवला जातो तर दुसरा पुत्रदा एकादशी व्रत श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळला जातो. श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशी 2022 असे म्हणतात. या व्रतामध्ये भक्त पुत्रप्राप्तीच्या इच्छेने भगवान विष्णूची खऱ्या मनाने आणि भक्तिभावाने पूजा करतात. यावर भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्यांना भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्याचे वरदान देतात.



श्रावणी सोमवार व्रत : 

श्रावणी सोमवार या संदर्भात ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. ह्या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास करावा. शिवलिंगाची पूजा करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस ह्यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहावी. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा हा क्रम असावा. ही मूठ वाहताना ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।। ‘ हा मंत्र म्हणावा. पाच वर्षांनंतर व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन ह्या व्रताची समाप्ती करावी.



1932 : सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट अभिनेते दादा कोंडके यांचा जन्मदिन.

कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके हे मराठी अभिनेते आणि चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगनाट्यातून आणि चित्रपटांतून अभिनय केला. द्वि-अर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेत तसेच हिंदी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मिती केली. तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या (इ.स. 1971), आंधळा मारतो डोळा (इ.स. 1973), पांडू हवालदार (इ.स. 1975), राम राम गंगाराम (इ.स. 1977), बोट लावीन तिथे गुदगुल्या (इ.स. 1978) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट. 



1879 : अल्कोहोलिक्स अॅडनॉनिमस’चे एक संस्थापक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ डॉ. बॉब स्मिथ यांचा जन्मदिन.



1908 : संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय संगीत गायिका सिद्धेश्वरी देवी यांचा जन्मदिन.



1912 : जागतिक कीर्तीचे भारतीय फलज्योतिषी बैंगलोर वेंकट रमन यांचा जन्मदिन.



1915 : पद्मभूषण पुरस्कार, साहित्य अकादमी व संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय लेखक,  नाटककार आणि अभिनेते भीष्म साहनी यांचा जन्मदिन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies