Type Here to Get Search Results !

भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती; आरोपीला अटक!



मुंबई: अंधेरी MIDC येथे १४ वर्षीय शाळकरी मुलीची भर रस्त्यात छेड काढल्याची घटना समोर आली. शाळेतून घरी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलींना पाहून अश्लील चाळे व शेरो-शायरी करणाऱ्या नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. रवी राजेंद्र प्रसाद शर्मा असे या आरोपीचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, अल्पवयीन मुलगी पुनम नगर येथील मातोश्री गार्डन येथील बस स्टॉप येथून जात असताना आरोपीने मुलीकडे पाहून अश्लील शेरेबाजी केली.त्यानंतर आरोपीने तिच्याशी जबरदस्तीही करण्याचा प्रयत्न केला.



दरम्यान, या प्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पिडीत महिलेच्या तक्रारीवरून ३५४, ५०६ भादवी कलमांसह ८,१२, पोस्को अॅक्ट २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies