Type Here to Get Search Results !

कार आणि ट्रकमध्ये धडक; एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू!



पुणे : पुणे-नगर महामार्गावरील रांजनगावजवळ कार आणि ट्रकची धडक झाली आहे. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि पुणे-अहमदनगर महामार्गावर चुकीच्या बाजूने आलेला ट्रक अचानक रोडच्या मध्ये आल्याने कारची ट्रकला धडक बसून हा अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.



दरम्यान, या अपघातात संजय मस्के (वय ५३), रामा मस्के(वय ४५), राजू मस्के(वय ७), हर्षदा मस्के(वय ४), विशाल मस्के(वय १६) या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून, साधना मस्के यांची प्रकृती सध्या गंभीर आणि चिंताजनक आहे.जखमींवर सध्या शिरूर येथील श्री गणेशा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies