Type Here to Get Search Results !

अल्पवयीन मुलीची विक्री करून लावले लग्न; मुलीवर चार महिने केले अत्याचार!



नंदुरबार : सातपुडा येथील धडगाव तालुक्यात तेलखेडी येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची विक्री करुन लग्न लावण्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीच्या आई-वडिलांची फसवणूक केल्याने सोलापूर जिल्ह्यातील चार जण तसेच धडगाव तालुक्यातील दोघे अशा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, धडगाव तालुक्यातील तेलखेडी येथील अल्पवयीन मुलीला संदीप सुकलाल पावरा, संगीता संदीप पावरा यांनी पाहुणी म्हणून घरी घेऊन जात असल्याचे सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे सुप्रिया महाडिक यांच्या मध्यस्थीने गोविंद नावाच्या व्यक्तीला तीन लाख साठ हजार रुपयांमध्ये पीडितेची विक्री करून लग्न लावल्याची घटना घडली,  गोविंदने मुलीच्या इच्छेविरुद्ध तीन ते चार महिने शारीरिक संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केला. 



दरम्यान,  याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी धडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies