Type Here to Get Search Results !

टीईटी घोटाळ्याप्रकरणी बोगस शिक्षकांना केले जाणार सेवा कार्यमुक्त; पगार वसुलीही होणार!



बीड - राज्यात सर्वत्र गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात, बीड जिल्ह्यातील 120 शिक्षकांचा समावेश आहे. या 120 शिक्षकांनी बोगस टीईटी प्रमाणपत्र हस्तगत करून विविध अनुदानित खासगी संस्थेत नोकरी मिळवली आहे. या बाबत बीड जिल्हा परिषदेने, 120 बोगस टीईटी प्रमाणपत्रे हस्तगत केले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. 



शिक्षण विभागाला याबाबत अधिकृत आदेश आल्यानंतर, या शिक्षकांची संस्थेतली सेवा कार्यमुक्त केली जाणार आहे. तसेच, या बोगस बहाद्दर शिक्षकांकडून, उचलण्यात आलेला पगार वसूल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.



दरम्यान, शासनाचे आदेश यांच्या बाबतीत अद्यापपर्यंत जिल्हा परिषदेला प्राप्त झालेले नाहीत. मात्र येत्या एक-दोन दिवसात हे आदेश प्राप्त होतील. त्यानंतर ज्या संस्थेत हे शिक्षक आहेत, त्या संस्था चालकाला पत्र देऊन, या शिक्षकांची सेवा कार्यमुक्त करण्यात येणार आहे. सोबतच सेवा कालावधीमध्ये यांनी उचललेला पगार वसुलही करण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies