पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. विकास वाघमारे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी माळशिरस पोलिस ठाण्यात अज्ञाता विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, विकास वाघमारे हे त्यांच्या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता. दरम्यान मारेक-यांना अंधाराचा फायदा घेवून विकासचे दोरीने हातपाय बांधून दांडक्याने व लोखंडी पाईपने त्याच्यावर वार केले. मारेक-यांनी विकासच्या डोक्यात मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, या खूनाची घटना जमिनीच्या वादातून घडली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पाेलिस त्या दिशेने देखील तपास करीत आहेत.