Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, रविवार २८ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष :

आपला साहसीपणा ताब्यात ठेवावा. आततायीपणा करून चालणार नाही. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.  दिवस स्वत:च्या मर्जीप्रमाणे घालवाल. घरात टापटीपपणा ठेवाल. 



वृषभ:

तुमच्याबाबतचे गैरसमज दूर होतील. कष्टाचा मोबदला मिळेल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको. सामाजिक गोष्टींचे भान राखावे. अनुकूलतेचा सदुपयोग करावा. 


मिथुन:

आळस झटकून टाका.  हातातील कामे पूर्णत्वास जातील. आर्थिक मिळकतीत वाढ होईल.  अंगीभूत कलेला वेळ द्यावा. स्व-कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. 


कर्क:

दिवसाचा पूर्वार्ध मजेत जाईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. मित्रांची भेट मन प्रसन्न करून देईल. अति गोड पदार्थ खाणे टाळा. धनसंचय वृद्धिंगत होईल. 


सिंह:

समोरच्याला आपण होऊन मदत कराल. नोकरदार वर्गाला विशेष लाभ मिळण्याची शक्यता.  जुनी देणी चुकवून टाका. शक्यतो वरिष्ठांना नाराज करू नका. व्यक्तिमत्वातून व बोलण्यातून चांगली छाप पाडा. 


कन्या:

झोपेची तक्रार जाणवेल. आहारावर नियंत्रण ठेवा.  बोलण्यातून कर्तृत्व सिद्ध कराल. मानसिक शांततेला अधिक महत्व द्याल. संशोधन वृत्ती डोके वर काढेल. 


तूळ:

ज्येष्ठांचे उत्तम मार्गदर्शन लाभेल. घरात शांत राहून सहकार्य करा. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. स्वप्नामध्ये अडकून पडू नका. पत्नीशी मतभेदाची शक्यता. 


वृश्चिक:

जुन्या मित्रांची गाठ पडेल. कोणावरही अवलंबून राहू नका. विशाल दृष्टिकोन बाळगावा. दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी सर्वार्थाने अनुकूलता लाभेल. 


धनू:

कमिशन मधून लाभ होईल. जुगार खेळताना सावधानता बाळगा. विद्यार्थ्यांना अनपेक्षित यश मिळेल. जुने संशय मनातून काढून टाका. नातेवाईकांशी सलोखा साधावा. 


मकर:

चहाडखोर व्यक्तीकडे दुर्लक्ष करावे. स्पर्धात्मक गोष्टींची आवड निर्माण होईल. घरगुती ताण-तणाव दूर करता येतील. जोडीदाराची प्रेमळ सौख्य लाभेल. विरोधकांवर मात करता येईल. 


कुंभ:

वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. आहारावर नियंत्रण ठेवावे.  कोणावरही अति विश्वास ठेवू नका. कामात संभ्रम होऊ देऊ नका. बाहेरील कामे पुढे ढकलावीत. 


मीन:

मित्रांच्या भेटी मन प्रसन्न करतील. कौटुंबिक वातावरण खेळते राहील.  बोलताना चुकीचा शब्द बाहेर पडणार नाही याची दक्षता घ्या. व्यायामाची आवड पूर्ण कराल. बर्या च दिवसांनंतर मित्रांची गाठ पडेल. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies