मुंबई: शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येणार आहेत, या संदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली आहे. सध्या लोकशाही धोक्यात आली आहे, यासाठी आम्ही नवे समीकरण जुळवत आहोत, लवकरच मोठा मेळावा घेणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे सौरभ खेडेकर यांनी दिली.
दरम्यान, यासंदर्भात संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बैठक घेतली. या बैठकीनंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत युती करणार असल्याचे जाहीर केले.