Type Here to Get Search Results !

आजचे दिनविशेष; जाणून घ्या इतिहासातील महत्वाच्या घटना!



आटपाडी: दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. ऑगस्ट महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचे महत्त्व नेमके काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 



हरतालिका पूजन : 

भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हरतालिका हे व्रत केलं जातं. अखंड सौभाग्य राहावं यासाठी हरतालिकेचं व्रत केलं जातं. या दिवशी अनेक ठिकाणी महिला वर्ग हरतालिकेची पूजा मोठ्या संख्येने करतात. यावर्षी हरतालिका 30 ऑगस्ट 2022 (उद्या) साजरी केली जाणार आहे. हरितालिका ही भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष तिथीला करतात. गणेशोत्सवाशी या व्रताचा संबंध नाही. कुमारिकांनी विशेषत: ही पूजा करावी. आणि आपलं मनोव्रत पूर्ण झालं म्हणून सौभाग्यवतींनीही ही पूजा करावी. तसेच ज्यांचे पती हयात नाहीत. त्यांनी उपोषण करावं असं हे व्रत आहे. या दिवशी वनामध्ये असणाऱ्या वेली, फुलं यांच्या पत्री घेऊन त्या अर्पण कराव्यात. या सर्व औषधी गुणांनी युक्त आहेत. त्यांचा संग्रह व्हावा. त्यांचं जतन व्हावं आणि ही पूजा संपन्न व्हावी यासाठी त्या पत्रींना महत्त्व आलं आहे. हे व्रत अनेक वर्ष स्त्रिया करत आलेल्या आहेत. वैराग्य आणि वैभव दोन्हीही आपल्याला अनुभवता आलं पाहिजे, मर्यादा त्याची सांभाळता आली पाहिजे, आणि अखंड पतीप्रेम मिळवता यावं म्हणून सुवासिनी, कुमारिका हे व्रत करतात.



1850 : काशिनाथ त्र्यंबक तेलंग – प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, काँग्रेसचे चिटणीस, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (1892), हिंदू कायद्यात सुधारणा होण्यासाठी त्यांनी प्रयत्नत केले. भगवद्‌गीतेचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला. 



1903 : भगवतीचरण वर्मा – हिन्दी कथाकार, कादंबरीकार, कवी, एकांकिकाकार, पटकथाकार आणि नाटककार, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित लेखक (मृत्यू: 5 आक्टॊबर 1981)



1883 : जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद – योगविद्येचे पुरस्कर्ते आणि शारीरिक शिक्षणतज्ञ, त्यांनी 1924 मध्ये ’कैवल्यधाम’ नावाची योगशिक्षणसंस्था स्थापन केली. संस्थेतील प्रयोगांची माहिती व्हावी यासाठी ’योगमीमांसा’ नावाचे त्रैमासिक काढले. त्याचे 7 खंड प्रकाशित झाले आहेत. (मृत्यू: 18 एप्रिल 1966 – मुंबई)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies