Type Here to Get Search Results !

भाविकांच्या वाहनाचा अपघात; तिघांचा जागीच मृत्यू!



हिंगोली : जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील भाविकांच्या वाहनाचा बेंगळुरु हायवेवर चित्रदुर्ग जवळ अपघात झाला  आहे. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत, तर सहा जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना चित्रदुर्ग येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे राहणारे वानखेडे व लोमटे कुटुंबीय असे नऊ जण वाहनाने बालाजी येथे दर्शनासाठी गेले होते. या दोन्ही कुटुंबाचे दर्शन झाल्यावर ते दोन्ही कुटुंब तेथून निघाले. मात्र, चित्रदुर्ग जवळ त्यांचे वाहन रस्त्याच्या खाली जाऊन उलटले. या भीषण अपघातात वाहनातील राजेश वानखेडे, शंकर लोमटे, रेखा लोमटे हे तिघे जण जागीच ठार झाले आहेत.



दरम्यान, या अपघतात गजानन वानखेडे, सावित्री वानखेडे, लक्ष्मण वानखेडे, अर्जून वानखेडे, कृष्णा बागल व गजानन वानखेडे यांची पत्नी असे सहा जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी चित्रदुर्ग येथील शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies