Type Here to Get Search Results !

प्रवासी वाहनास पिकअपची धडक; गाडी खाली येऊन अकरा महिन्यांचा बालक ठार अन...!पाचोरा (जळगाव) : नंदीचे खेडगाव (ता. पाचोरा) गावाजवळ जळगाव ते पाचोरा रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनास भरधाव मालवाहू पिकअपने धडक दिल्याने प्रवासी वाहतूक करणारी गाडी रस्त्याच्या खाली उतरून उलटली. त्यात अकरा महिन्यांचा बालक गाडी खाली येऊन जागीच ठार, तर गाडीतील नऊ जण जखमी झाले. पाचोरा पोलिसांनी पिकअप चालकास ताब्यात घेतले आहे.  अपघातात वाहनचालक भय्या कोळी (रा.नंदीचे खेडगाव), अनिता चव्हाण (वय ३८, रा. कोकडी तांडा), सुशीला राठोड (वय ३८), विकास पवार (वय २७), लता राठोड (वय ३७), निकिता राठोड (वय १८, तिघेही रा. रामदेव वाडी), अनिता सोनवणे (वय २२, दापोरा), ऋषिकेश पंडित (वय १६, रा. लासगाव) हे गंभीर जखमी झाले.याबद्दल अधिक माहिती अशी कि, प्रवासी वाहतूक करणारी गाडी (एमएच १५, एएक्स १८३२) प्रवासी घेऊन पाचोऱ्याकडे येत असताना शिरसोली येथे दापोरा येथील रहिवासी भगवान सोनवणे यांनी आपली पत्नी अनिता व अकरा महिन्यांचा मुलगा गणेश यांना रक्षाबंधनासाठी भडगाव येथे जाण्यासाठी गाडीत बसवले. दुपारी दोनच्या सुमारास खेडगाव नंदीचे येथून प्रवासी वाहतूक करणारे हे वाहन पाचोऱ्याकडे येत असताना पाचोऱ्याकडून भरधाव येणाऱ्या मालवाहू पीकअपने (एमएच १९, सीवाय ९२२३) जोरदार धडक दिली. त्यामुळे प्रवासी गाडी रस्त्याखाली उतरून उलटली. त्यात अकरा महिन्यांचा गणेश जागीच ठार झाला.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात भरती करण्यासाठी रवाना करीत पिकअप चालकास ताब्यात घेतले. पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies