Type Here to Get Search Results !

पती-पत्नी कार्यक्रम आटोपून रस्त्यावरून घरी जात असताना अचानक मागून...!



बार्शी : बार्शी-सोलापूर रस्त्यावरुन जाणाऱ्या एका दाम्पत्याला चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून सोन्यासे दागिने आणि पाच हजार रुपये असा सुमारे दोन लाखांचा ऐवज लुटल्याची घटना घडली. पत्नी-पत्नी रस्त्यावरुन दुचाकीने जात असताना चोरट्यांनी त्यांना मागून धडक दिली आणि चोरीची संधी साधली. याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी  चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  बार्शी येथील माऊली मंगल कार्यालयात कल्याण जाधव पत्नी उषा यांच्यासह एक कार्यक्रम आटोपून घरी जात असताना लक्ष्मी मंदिराजवळ पाठीमागून दोन दुचाकीवरुन चार तरुण आले. त्यानंतर त्यांनी दाम्पत्याला खाली पाडले.एका तरुणाने चाकूचा धाक दाखवून पत्नीच्या अंगावर असलेले एक तोळा सोन्याचे गंठण, एक तोळ्याचे कानातील फुले,एक तोळ्याची बोरमाळ,अर्धा तोळ्याचे मंगळसूत्र,पाच हजार रुपये रोख असा ऐवज काढून घेतला.



दरम्यान, याप्रकरणी बार्शी येथील भांडेगाव येथे राहणारे कल्याण जाधव(57) यांनी फिर्याद दाखल केली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies