Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, सोमवार ८ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:-

वैचारिक गोंधळ राहील. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. खर्च वाढते राहतील.  संकल्पित कामे पूर्णत्वास जातील. त्यातून कोणतेही मत मांडायला जाऊ नका.



वृषभ:-

मन प्रसन्न राहील.  भावंडांचे सहकार्य लाभेल. वाचनात मन रमवावे. सामाजिक वादात लक्ष घालू नका. हातातील कामात यश येईल.



मिथुन:-

कौटुंबिक खर्च वाढू शकतो. कामाचा आढावा लक्षात घ्यावा. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदाराचा सल्ला घ्यावा. मानसिक गोंधळ टाळावा.



कर्क:-

घरगुती कामे वाढीव राहतील. कामात यथायोग्य बदल संभवतात. कौटुंबिक खर्च वाढता राहील. आळस टाळून कामे करावीत. नवीन प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करावे.



सिंह:-

स्वावलंबी बनावे लागेल. अतिउत्साह दाखवू नका. निष्काळजीपणा दाखवू नका. वास्तविकतेचे भान ठेवावे लागेल. पर्यटनाची योजना तूर्तास आखू नये.



कन्या:-

नेमकी कृती यश देईल. खर्च आवाक्याबाहेर जाऊ देऊ नका. तुमचा हेतू साध्य होईल. मनाची ताकद ओळखा. मनातील इच्छा पूर्ण होईल.


तूळ:-

मनातील शंका काढून टाकावी. परोपकाराचे महत्त्व लक्षात येईल. नवीन विचारातून शिकायला मिळेल. घाईने निर्णय घेऊ नयेत. विनाकारण शत्रुत्व पत्करू नका.



वृश्चिक:-

उगाच विरोधाला विरोध करू नका. औद्योगिक वाढीसाठी धोरण बदलणे आवश्यक. आर्थिक स्थिती उत्तम राहील. बोलण्यात तिरकसपणा आणू नका. मत सौम्यपणे मांडावे.



धनू:-

मनातील भावना व्यक्त कराव्यात. वाहन चालवताना काळजी घ्यावी. वैवाहिक सौख्यात भर पडेल. स्वयं निर्णयावर भर द्यावा. मनोरंजनात मन रमवावे.



मकर:-

जोडीदाराशी प्रेमळ वार्तालाप कराल. इतरांवर अवलंबून राहू नका. आपल्या उपायांचा चांगला परिमाण जाणवेल. उत्तराला प्रत्युत्तर करू नका. घरातील वातावरण तप्त राहील.



कुंभ:-

आपल्या कामावर विश्वास ठेवावा. भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. वरिष्ठांचे सहकार्य घ्यावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. वाढीव मेहनत करावी लागू शकते.



मीन:-

करमणुकीत दिवस घालवाल. परस्पर संवादाने कामे होतील. जोडीदाराचा विश्वास संपादन कराल. इतरांचे मत जाणून घ्यावे. स्पर्धा जिंकता येईल. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies