Type Here to Get Search Results !

“भाजपात या,CBI चौकशी बंद करू”; भाजपची ‘यांना’ ऑफर?



दिल्ली :दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सध्या सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. लिकर धोरणासंदर्भात बदल केल्याने त्यांची चौकशी केली जात आहे. अशात सिसोदिया यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. आम आदमी पक्ष फोडा आणि भाजपात या, सर्व सीबीआय व ईडीच्या सर्व केस बंद करतो, अशी ऑफर आपल्याला भाजपने दिली असल्याचा दावा सिसोदिया यांनी केला आहे. 



यासंदर्भात सिसोदिया यांनी करत म्हणाले, 'मला भाजपचा संदेश मिळाला आहे 'आप'फोडून भाजपमध्ये सामील व्हा, सीबीआय-ईडीची सर्व प्रकरणे बंद केली जातील. भाजपला माझे उत्तर- मी महाराणा प्रताप यांचा वंशज आहे, मी राजपूत आहे. मी माझे शीर धडावेगळे करेल, पण भ्रष्ट-कारस्थानी लोकांसमोर झुकणार नाही. माझ्यावरील सर्व खटले खोटे आहेत. तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा'.अशी भूमिका ट्विटरवरून मांडली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies