“भाजपमध्ये गेल्यावर ED ने कारवाई केल्याचे दाखवा अन् १० लाख जिंका”: राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने लावले बॅनर्स!



मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी रात्री ईडीने पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक केली. दरम्यान, त्यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा केंद्रीय तपासयंत्रणांमार्फत भाजपकडून विरोधकांना लक्ष्य केले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच, औरंगाबाद शहरात एका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने बॅनर्स लावल्याने या राजकीय वर्तुळात  या चर्चांना उधान आले आहे. 



भाजपमध्ये असलेल्या नेत्यांवर तसेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांवर 'ईडी'ची कारवाई झाल्याचे दाखवा आणि दहा लाख मिळवा, असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील यांनी औरंगाबाद शहरातील अनेक भागात अशा स्वरुपाचे बॅनर्स लावले आहेत.



दरम्यान, सध्या राज्यात ईडीच्या कारवाया वाढल्याने या बॅनर्सचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured