मुंबई :शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी सध्या ईडी कोठडीत आहेत. याच प्रकरणी राऊत यांना आज कोर्टात हजर करण्यात आले आहे. यावेळी न्यायालयाने राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे आता त्यांना आणखी १४ दिवस कोठडीत राहावे लागणार आहे.
दरम्यान, न्यायालयाकडून राऊतांना दिलासा मिळालेला नाही. कारण त्यांची कोठडी २२ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.